Crypto Currency ही संकल्पना मार्केट मध्ये नवीन आणि सोपी असल्यामुळे भावनेच्या भारत येऊन आपण ट्रेडिंग करताना खूप अश्या चुका करतो ज्यामुळे फायदा होण्या ऐवजी तोटा होतो आणि आपण निराश होतो...
यामध्ये fraud होण्याचे पण chances वाढले आहेत काही लोक कॉइन लाँच होण्याअगोदरच त्याचा सेल करत आहे जे की पूर्णपणे चूकीचे आहे..
या करिता जर आपली Crypto Currency मध्ये investment करण्याची इच्छा असेल तर नक्कीच ह्या लेखाचा फायदा होईल
अश्या कोणत्या "Big Mistakes"आहेत की ज्या आपण करतो आहोत किंवा करू नये...
लेखाचे मुख्य विषय:
०१.आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन Investment करणे.
०२.संशोधन(Research)न करता Investment करणे.
०३ .Trading without any proper strategy (योग्य strategy चा अभ्यास किंवा वापर न करणे)
०४ .कुठल्याही एकाच Currency मध्ये पूर्ण Investment
०५ .स्वताला Update न ठेवणे.
०६ .असुरक्षित Plate Form वर ट्रेडिंग.
०७ ट्रेडिंग Without प्रॅक्टिस....
०८ .ट्रेडिंग फॉर शॉर्ट टाईम पिरियड .
०९ .Price च्या आधारावर ट्रेडिंग करने.
१०.Without प्लॅन Investment
११.आपल्याला झालेला नफा वारंवार काढून घेणे
१२.समजून घेऊन गुंतवणूक करणे
Mistake No.01
आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन Investment करणे.
सगळ्यात मोठी आणि महत्वाची चूक जी नवीन त्रेडर करतात ती म्हणजे अनुभव नसताना आणि आपली तोटा सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक इंवेस्टमेंत करणे ही आहे.....
ही मार्केट खूप Volatile मार्केट आहे इथे कधी कुठली करन्सी High होईल आणि कधी कोणती करन्सी Reverse जाईल हे सांगता येत नाही....म्हणून या मध्ये विचारपूर्वक गुंतवणूक केली गेली पाहिजे...जर आपण सर्व च्या सर्व रक्कम करन्सी मध्ये गुंतवली आणि अचानक ती करन्सी Reverse आली आणि आपण गुंतवली सर्व रक्कम Loss झाली तर ....त्याचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर नकारात्मक नाही झाला पाहिजे....
काही लोक डोळे झाकून कर्ज काढून पूर्ण Investment करन्सी टॉप ला असेल तर करून टाकतात...
हे बघा हे मार्केट आहे आणि इथे Up-Down होताच राहणार जी करन्सी आज Bottom ला आहे ती कधीतरी Top ला जाणार आहे आणि जी Top आहे. ती Bottom ला पण जाणार आहे....म्हणून जेवढा Loss सहन करता येऊ शकतो तेवढीच Investment करा नसता असलेली रक्कम गमवण्याची वेळ येईल आणि आपले दिवाळे निघेल...
मग अश्या वेळेस जेंव्हा करन्सी ची किंमत कमी होते त्यावेळेस आपण केलेली Investment लॉस मध्ये जाते आणि आपल्याला कंगाल होण्यास वेळ लागत नाही....
So be careful while investing in crypto currency....

Mistake No 02
संशोधन न करता गुंतवणूक करणे(Investment without Research)

संशोधन काय आणि कसे करावे.....
०१. किंमत (Price)
जसे शेअर मार्केट मध्ये आपण पाहतो कि कुठल्या शेअर ची मार्केट कॅपिटल किती आहे त्याच प्रकारे | CoinMarketCap सर्व Crypto Currencies विषयी आपल्या माहिती पुरवते . "CoinMarketCap ही क्रिप्टोअसेट्ससाठी जगातील सर्वाधिक संदर्भित किंमत-ट्रॅकिंग वेबसाइट आहे"ह्या वेब साईट मध्य currency ची किमत,मार्केट कॅप,volume ,circulating supply ची माहिती उपलब्द आहे.सध्याच्या काळात झपाट्याने वाढत असलेली coin मार्केट कॅप ला टक्कर देणारी website Cryptocurrency Prices, Charts, and Crypto Market Cap | CoinGecko हि आहे जिथे पण आपण coin मार्केट विषयी माहिती गोळा करू शकतो आणि आपल्या budget मध्ये असणाऱ्या currency मध्ये हवी तशी गुंतवणूक करू शकतो.
०२.ऑफिसियल वेबसाईट
ओफिसियल website आपल्याला ओळखता आली पाहिजे.ज्या मध्ये सर्व Founder Member ची नावे किंवा त्यांचा team विषयी तासेल त्यांचा goal काय आहे?goal ठरलेला आहे कि नाही ? legal संकेतस्थळ,वैगेरे..तसेच ज्यांनी website बनवलेली आहे त्यांची शैक्षणिक पात्रता योग्य आहे व त्यांना काही अनुभव आहे कि नाही,Search केल्या बरोबर website लगेच open होती कि काही error येते हे सर्व बाबी तपासून घेणे आवश्यक आहे ,या पैकी कुठली हि गोष्ट जर अपूर्ण वाटली तर त्या मध्ये गुंतवणूक न करणेच योग्य राहील०३.Transperency (पारदर्शकता)
जो प्रोजेक्ट किंवा website तयार केलेली आहे ती site सर्वाना सर्व माहिती पुरवते का नाही,किंवा त्या मध्ये partnership असलेली हस्ती मोठी किंवा नावाजलेली आहे का?
इतर काही मुद्दे ज्या आधारावर आपण संशोधन केले पाहिजे .
* एक्सप्लोरर लिंक द्वारा traders ला Inetresting विश्लेषण माहिती पुरवली जाते का ?
* ही क्रिप्टोकरन्सी काही अडचणी सोडवते का?
* आपल्या जीवनात ही करन्सी सोडवणारी काही अडचण आहे का?
* या करन्सीने दिलेला या अद्चानिवरचा उपाय ममध्ये काही तथ्य आहे का?
* क्रिप्टोकरन्सी चे संस्थापक आणि त्यांचे पत्ते येथे बरोबर सूचीबद्ध आहेत का?
* या करन्सीबाबत कुठल्या नकारात्मक सोशल मीडिया कुजबुज सुरू आहेत?
* या क्रिप्टोकरन्सीचे संस्थापक खरोखरच खरे लोक आहेत का?Fraud आहेत ?
यापैकी बहुतेक सकारात्मक असल्यास, तुम्ही त्या क्रिप्टोकरन्सीचे श्वेतपत्र तपासावे. व्हीपेपर कायदेशीर दिसते का? त्यात सर्व तपशील आहेत का?योग्य Strategy चा अभ्यास किंवा वापर न करणे(Trading without any proper strategy)
आपण नवीन नवीन ज्या वेळेस गुंतवणूक करतो त्या वेळेस करन्सीचा वाढता कल पाहून आपली जमा पुंजी आपण एकाच करेन्सी मध्ये गुतवून टाकतो आणि हे एक Volatile मार्केट आहे इथे कधीही आणि केंवाही काहीही होऊ शकते .
वाढत चालेलेली कारेंशी जर यदाकदाचित reverse आली तर मग डुबली का आपली सर्व गुंतवणूक ? त्या करिता वेगवेगळ्या कारेशीमध्ये गुंतवणूक केली तर एखादी कारेंशी reverse जर आली तरी बाकीच्या उरलेल्या गुंताव्नुकीमध्ये आपल्या ला तोटा होणार नाही हे नक्की...
थोडक्यात
०१.वेगवेगळ्या कोईन मध्ये invest करा
०२.पोर्त्फ़ोलिओ मध्ये कमीतकमी ५ तरी coin असावेत
०३.volatality लक्षात असू द्या
०४.सगळीकडे थोडी थोडी Amount invest करा.
तुमचे सर्व आंबे एका टोपलीत टाकणे ही क्रिप्टोच्या जगात चांगली रणनीती नाही. क्रिप्टो गुंतवणुकीत जोखीम कमी करण्यासाठी एक चांगली रणनीती म्हणजे तुमचा क्रिप्टो पोर्टफोलिओ विविध नाणी आणि क्रिप्टो प्रकल्पांमध्ये गुंतवणे. क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनशी संबंधित अनेक गुंतवणूक बाजारात उपलब्ध आहेत, ज्यात "इंटरनेट ऑफ थिंग्ज," नॉन फंजिबल टोकन्स, डीफाय प्रकल्प आणि नाण्यांच्या विविध प्रकारांचा समावेश आहे.
Mistake No 05
समजून घेऊन गुंतवणूक करणे(Understand what you’re investing in)
जसे तुम्ही कोणत्याही गुंतवणुकीसाठी, तुम्ही नक्की कशात गुंतवणूक करत आहात ते समजून घ्या. तुम्ही स्टॉक खरेदी करत असल्यास, प्रॉस्पेक्टस वाचणे आणि कंपन्यांचे सखोल विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्रिप्टोकरन्सीसह असेच करण्याची योजना करा, कारण तेथे अक्षरशः हजारो आहेत, ते सर्व वेगळ्या पद्धतीने कार्य करतात आणि दररोज नवीन तयार केले जात आहेत. तुम्हाला प्रत्येक व्यापारासाठी गुंतवणूक प्रकरण समजून घेणे आवश्यक आहे.